Share

झोपेपूर्वी घेतलेल्या गोळ्यांनी केला अभिनेत्याचा घात? ; सिद्धार्थच्या मृत्यूबाबतच्या चर्चांना उधाण

Published On: 

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी निधन झाले आहे. मुंबईतील कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 40 वर्षीय सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. याची पुष्टी कपूर रुग्णालयाने केली आहे.

सिद्धार्थचा मृत्यू उपचारापूर्वीच झाला असून त्याने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली असल्याची माहिती समोर आली त्यामुळे आता लोकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहे. सिद्धार्थने घेतलेल्या गोळ्यांनंतर तो झोपेतून उठलाच नाही. त्यामुळे सेवन केलेल्या औषधांमुळेच त्याचा मृत्यू झाला का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टीव्ही इंडस्ट्रीचे मोठे नाव सिद्धार्थ शुक्ला याने बिग बॉस या रिअॅलिटी शोचा 13 वा सीझन जिंकला याशिवाय त्याने ‘खतरों के खिलाडी’ याचा सातवा हंगामही जिंकला. बालिका वधू या मालिकेतून सिद्धार्थ शुक्लाने देशातील प्रत्येक घरात आपला ठसा उमटवला. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. तसेच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!