Share

‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन

Published On: 

पुणे – राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या ‘शंखनादा’नंतर घंटानाद आंदोलन सुरू करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. त्याप्रमाणे आता पुण्यात आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केलं.

शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने मंदिरे उघडण्याची मागणी करताना राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, या आंदोलनावेळी कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे देखील दिसून आले.

दरम्यान, करोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. पुण्यात आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता मनसेबाबत प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!