मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी निधन झाले आहे. मुंबईतील कपूर हॉस्पिटलने सिद्धार्थच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. 40 वर्षीय सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीनंतर सर्वांनाच धक्का बसला.
छोट्या पडद्यावरील सिद्धार्थने कमी काळात अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याच्या निधन झाल्याच्या वृत्ताने सर्वचजण दु:ख व्यक्त करत आहेत. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने मनोरंजन तसेच क्रिकेट विश्वातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रत्येकाला सिद्धार्थच्या मृत्युच्या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.
यातच अभिनेता रितेश देशमुख याने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. रितेशने ट्विट करत लिहिले, श’ब्दांच्या पलीकडचा धक्का !! खूप लवकर निघून गेलास…. त्याच्या कुटुंबाला, प्रियजनांना संवेदना. त्याच्यावर लाखो लोकांचे प्रेम होते. सिद्धार्थ शुक्ला तुमची आठवण येईल.’ अशी पोस्ट लिहीत रितेशने त्याच्या कुटूंबियांना तसेच त्याच्या चाहत्यांना धीर दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- गणेश मंडळांनी मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला जेम्स बाँड सिरीजमधील २५ वा चित्रपट
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- एसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आज लोकायुक्तांपुढे सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
