मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांच्या सीबीआय चौकशीला विरोध करण्यासंदर्भातील महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली आहे. आता यावरूनच भाजपने ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.
सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात जो गुन्हा दाखल केला आहे, त्यात बदल्या, नियुक्त्या तसेच एका अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्याबाबतचे दोन परिच्छेद आहेत. हे परिच्छेद वगळले जावेत, असे राज्य सरकारने याचिकेत नमूद केले होते. दरम्यान ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. यावरूनच ताशेरे खाल्ले, तिखट बोल ऐकले आणि आता थोबाड रंगायचं बाकी आहे. असे म्हणत पोलिस बदल्यातील भ्रष्टाचारविरुद्ध सीबीआयने दाखल केलेला FIR रद्द करण्यास नकार देऊन सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारची पळवाट बंद केली आहे. सीबीआय लवकरच मंत्रालयाची पायरी चढणार. अशा आशयाचे ट्विट मुंबई भाजपने केले आहे.
https://twitter.com/BJP4Mumbai/status/1428236557094244355
दरम्यान या निर्णयामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीकडून पाचवे समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नाही. यावरूनही ठाकरे सरकारवर भाजपने सडकून टीका केली आहे. तर आता पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांच्या सीबीआय चौकशीला विरोध करण्यासंदर्भातील निर्णयामुळे ठाकरे सरकारवर निशाना साधत भाजपने टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाळासाहेबांचे विचार एखाद्या कंपनीची शेअर्स इक्विटी नाही, त्यांचं दर्शन कुणीही घेऊ शकते’.
- ‘तेव्हा जे शरद पवार तलाक बद्दल म्हणाले होते, तेच तालिबानी शरियाबद्दल सांगतायत’
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
- भाजपला ‘जन आशीर्वाद’ महागात पडला; कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल


