Deepali Sayed । मुंबई : आज शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठी वक्तव्य केली आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सल्ला दिला आहे. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेट कधी होणार. या मुद्यावरून गेले अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शिंदे-ठाकरे भेटीबाबत सय्यद यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या कि, शिवसेनेतील दोन्ही गटांना पुन्हा एकत्र यायचंय, पण कुठेतरी मान, अपमान, अहंकार या गोष्टी मध्ये येतायत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. उद्धव ठाकरे हे आमचे प्रमुख नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांच्याकडे आम्ही वडीलधारे म्हणूनच पाहतो. त्यांनी सर्वांना सांगितलं की मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत. ते हाक मारत आहेत. साहेबांनी बोलावलं आहे. त्यामुळे बंडखोरांनी यावं. शिंदे गटाकडून कोणी बोलत नाही. कुठे तरी काही गोष्टी अडत आहेत. त्या तोडण्याचा माझा प्रयत्न दिसेल, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, दिपाली सय्यद यांनी संजय राऊत यांना संयमाचा सल्ला दिला आहे. राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची ती शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यामागे त्यांचा हेतू फक्त शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो. पण राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रित आणावं, असं आवाहन दिपाली सय्यद यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या :
- PV Sindhu : शाब्बास पीव्ही सिंधू! पटकावलं सिंगापूर ओपन २०२२ मध्ये विजेतेपद
- Mahesh Tapase | मुख्यमंत्र्यांनी जाणून – बुजून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी थांबवला – महेश तपासे
- CM Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरेंच्या नावे असणारी ‘ती’ योजना कार्यान्वित करणार; शिंदे सरकारचा निर्णय
- Deepali Sayed : संजय राऊत, शांतता घ्या, ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्या; दिपाली सय्यद यांचा सल्ला
- Uday Samant | आमच्या मनात उद्धव साहेबांसाठी आदर कायम राहणार – उदय सामंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

