Share

Deepali Sayed : संजय राऊत, शांतता घ्या, ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्या; दिपाली सय्यद यांचा सल्ला

Published On: 

Deepali Sayed । मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपने नवीन सरकार स्थापन केले. मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निशाण्यावर मात्र शिंदे गट होता. सध्या संजय राऊत आणि शिंदे गट यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. यावर आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी संजय राऊतांना सल्ला दिला आहे.

दिपाली सय्यद यांनी संजय राऊत यांना संयमाचा सल्ला दिला आहे. राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची ती शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यामागे त्यांचा हेतू फक्त शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो. पण राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रित आणावं, असं आवाहन दिपाली सय्यद यांनी केलं.

तसेच पुढे पत्रकार परिषदेत बोलताना सय्यद म्हणाल्या कि, शिवसेनेतील दोन्ही गटांना पुन्हा एकत्र यायचंय, पण कुठेतरी मान, अपमान, अहंकार या गोष्टी मध्ये येतायत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट होणार असल्याचा दावाही सय्यद यांनी केला.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!