Share

Uday Samant | आमच्या मनात उद्धव साहेबांसाठी आदर कायम राहणार – उदय सामंत

Published On: 

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र यायचे असेल तर त्याबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे मत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले. उदय सामंत आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले की, “होय आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत. पण जे नगरसेवक आमच्यासोबत येत आहेत ते शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी येत आहेत. रत्नागिरीतही 18 नगरसेवक मला भेटले आणि त्यांनीही शिंदेंच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. माझी आज पिंपरी चिंचवड येथील काही नागरिकांशी चर्चा देखील झाली आहे. पण याचा अर्थ शिवसेना फुटली असा होत नाही”. तसेच मंत्री मंडळ विस्ताराबद्दल विचारले असता, कुणाला कोणते पद द्यायचे हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आहे, असे देखील ते म्हणाले.

पुढे बोलताना सामंत म्हणाले, “आमच्या या उठावात एकनाथ शिंदे एकदाही म्हणाले नाहीत कि, मला शिवसेना बळकवायची आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण मला ताब्यात घ्यायचा आहे किंवा मला पक्षप्रमुख व्हायचे आहे. त्यामुळे असा कोणताही गैरसमज करु नये. उध्दव साहेबांसाठी जो आदर काल आमच्या मनामध्ये होता तो आज ही आहे आणि भविष्यात देखील राहणार आहे”.

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली होती. “नकली धर्मवीराने स्वतःच्या स्वार्थासाठी लाचारी पत्करली आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला उभे केले, त्याच शिवसेनेला संपवण्याचे पाप बंडखोर आमदार करत आहेत. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली ते बंडखोर आमदार यापुढे रस्त्यावर भीक मागत फिरतील, अशी टीका त्यांनी केली त्यावर देखील उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत, आम्ही फक्त शिंदे साहेबांच्या भूमिकेचं समर्थन करतोय. तसेच विनायक राऊत हे माझ्या वडिलांसारखे आहे. त्यांनी कितीही टीका केली तरी मी त्यांच्यावर टीका करणार नाही, कारण ती आपली संस्कृती नाही”, असे सामंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!