Share

CM Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरेंच्या नावे असणारी ‘ती’ योजना कार्यान्वित करणार; शिंदे सरकारचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मविआ सरकारच्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. तर काही निर्णयांवर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून मविआ नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावे असणारी एक योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या कारभाराला गती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा आराखडा २१०० कोटींचा होता. त्यापैकी ७४.०२ कोटी उपलब्ध झाले असून ३४.७९ कोटी रुपये खर्च झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्त पदांची भर्ती करून या योजनेला गती देण्याचे आदेश दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या योजनेचे नाव मविआ सरकारने बदलले होते. या योजनेतून ६० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी १०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर निधीपैकी प्रत्येक महिन्यात सात टक्के प्रमाणे निधी योजनेला मिळेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!