Share

Deepali Sayed : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; दिपाली सय्यद यांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत भाजपच्या सहकार्याने राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन  केले. यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात शामिल होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सेनेला जणू गळतीचे ग्रहणच लागले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तथा आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना मातोश्रीचे दार कधीही उघडे असल्याचे म्हणत त्यांना परतण्याचे आवाहन केले. दरम्यान सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. “येत्या दोन दिवसात आदरणीय उध्दवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खुप बरे वाटले. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उध्दवसाहेबांनी कुटूंबप्रमुखांची भुमिका मोठ्यामनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्ती करीता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद! चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल.”, असे ट्वीट दिपाली सय्यद यांनी केले आहे.

दरम्यान दिपाली सय्यद यांनी सदरील ट्वीट भाजप नेत्या पंकजा मुंडे तसेच विनोद तावडे यांना टॅग केले आहे. त्यामुळे शिवसेनेत मध्यस्ती करणारे हे दोन नेते भाजपचे असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार, अशा चर्चा राजकारणात रंगत आहेत.

स्वतंत्र संसार मांडा – संजय राऊत

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला आव्हान दिले आहे. “शिवसेना सोडली म्हणल्यावर आता अपेक्षा न ठेवता आपला स्वतंत्र संसार मांडा. बंडामुळे पक्षाला काही एक फरक पडणार नाही. शिवसेना-शिवसेना करण्यापेक्षा पक्षाची स्थापना करून मतदारांपुढे जा , म्हणजे अस्तित्व लक्षात येईल. ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आहे आणि भविष्यातही राहिल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानाचा मुद्दा घेऊन बंड केलेल्यांकडे आता स्वाभिमान दाखवून द्यायची संधी आहे. आता शिवसेनेच्या पंखाखाली राहून आपला स्वाभिमान जपू नये. अनेकांनी पक्ष सोडूनही शिवसेना नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवस उजाडत नाही त्यांना स्वत:चा स्वाभिमान दाखवून द्यावा. असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!