सातारा : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी याआधीच कार्यक्रमांच्या आयोजनाची तयारी झाली आहे.
गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. भाजप, मनसेसह राज्यातील शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. शिवभक्तांच्या रोषानंतर शिवजयंतीच्या कार्यक्रमाला १० लोकांची उपस्थित असावी असा निर्णय नजरचुकीने झाल्याचं सांगत राज्य शासनाने १०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली.
तर, बाईक रॅली, पोवाडे, इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे. यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोरोनाचं असलेलं सावट लक्षात घेता शिवजयंती योग्य काळजी घेऊन साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
‘कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांनी जवळची लोकं गमावली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाची अस्मिता आहेत. त्यांची जयंती ही झालीच पाहिजे. परंतु आपल्या लोकांची काळजी घेणे ही आपली आणि शासन अशा सर्वांचीच जबाबदारी आहे. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी सुद्धा असाच विचार केला असता. त्यांनी लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. त्यामुळे शिवजयंती साजरी जरूर करा, पण स्वतःची सुद्धा काळजी घ्या,’ असं आवाहन उदयनराजेंनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मी फकीर आहे, धनंजय मुंडेचं नाव आत्ता घेतोय,आधी घेतलं व पुढे देखील घेणार’
- फास्टॅगसाठी ‘हीच’ अंतिम तारीख; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती
- ‘उद्धव ठाकरेंना पूजा चव्हाण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणालाही पाठीशी घालणार नाहीत; संजय राऊतांचं स्पष्टीकरण
- ‘रोहिणी खडसे यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू’


