मुंबई : पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी केला आहे.
या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या टेप्स बाराखडी पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. दरम्यान, संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर बंजारा समाज देखील एकवटल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी बंजारा समाजाची बदनामी केली जात असल्याचे बंजारा समाज मोर्चा आयोजकांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणी भाष्य केलं आहे. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी कालच स्पष्ट शब्दात सांगितलंय की पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीतून सत्य समोर येईल. मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही,’ असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे आधारस्तंभ – संजय राऊत
- फास्टॅगसाठी ‘हीच’ अंतिम तारीख; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती
- ‘उद्धव ठाकरेंना पूजा चव्हाण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही’
- IndvsEng : पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत भारताची भक्कम स्थिती !
- उद्यापासून महाविद्यालये सुरु ; पुण्यात अभाविप करणार ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

