Share

‘मी फकीर आहे, धनंजय मुंडेचं नाव आत्ता घेतोय,आधी घेतलं व पुढे देखील घेणार’

Published On: 

सांगली : पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरुन पूजा ने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून आत्महत्या केली असल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्याचबरोबर पोलिसही हे प्रकरण दबावामुळे गांभीर्याने घेत नसून पूजाच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये अनेक धक्कादायक बाबी असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे होते.

आज सांगली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप कुठे आहे? मोबाईलमधील संवाद कुणाचे आहेत. ज्यांचं नाव या प्रकरणात येत आहे ते सध्या कुठे आहेत? पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप कुठे आहे? शवविच्छेदन अहवाल दोन कसे आले? आदी प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. तसेच रेणू शर्मा-करुणा शर्मा प्रकरणावरुनही सरकारवर आरोप केले. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांनी मंत्री संजय राठोड यांचं एकदाही नाव घेतलं नाही. त्यावरुन पत्रकारांनी पाटील यांना प्रश्न विचारला की, ते अद्याप कोणत्याही नेत्याचं नाव का घेत नाहीत? त्यावर पाटील म्हणाले की, त्या संबंधित व्यक्तीचं नाव अजून पोलीस रेकॉर्डवर नाही, किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे आम्ही तसा उल्लेख टाळतोय. परंतु रेणू शर्मा किंवा करुणा शर्मा प्रकरणात आम्ही धनंजय मुंडेंचं नाव घेणारच. असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, रेणू शर्माने केलेले अनेक आरोप धनंजय मुंडे यांनी मान्य केले आहेत. त्यानंतर रेणू शर्मा यांनी त्यांची तक्रार मागे घेतली. तर दुसऱ्या बाजूला करुणा शर्मा प्रकरणातही धनंजय मुंडेंचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे आम्ही धनंजय मुंडे यांचं नाव घेणारच. त्यांचं नाव घ्यायला आम्ही कोणालाही घाबरत नाही. मी तर फकीर माणूस आहे. मी धनंजय मुंडे यांचं नाव आत्ता घेतोय, आधी घेतलं होतं आणि पुढेदेखील घेणारच.अशी घणाघाती टीका यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!