मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक होऊन आंदोलने केली. यानंतर, स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने याचिका दाखल केल्या.
मात्र, आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांसह भाजप नेत्यांनी केला होता. आज, खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणप्रश्नी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आऱक्षणासाठी काम केलं तरीही आपण त्यांनाच नावं ठेवतो. आता तुम्ही सत्तेत आहात तर ते पुढं न्यावं. तुम्हाला जर हे जमणार नसेल तर पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणावरुन भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत वादग्रस्त आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असतानाही देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सत्ता द्या, मी मराठा आरक्षण मिळवून देतो, असे म्हणणे धक्कादायक आणि आक्षेपार्ह आहे.
गेल्या सहा वर्षांत ‘मोदी है तो मुमकीन है’ अशा भावनेतून संविधानिक संस्थांवर दबाव आणला जात आहे. यातूनच भाजपा नेत्यांमध्ये आलेला हा विश्वास लोकशाहीसाठी चिंता वाढवणारा आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, राज्य सरकारने घटनापीठाची स्थापना करावी यासाठी चारवेळा सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. तरी अजूनही घटनापीठ स्थापन झाले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे. त्यासाठी निष्णात वकीलांची फौजही काम करत आहे. सरकार या प्रकरणी सर्व प्रयत्न करत असताना काही लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचे काम करत आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यातून फडणवीस सर्वोच्च न्यायालयालाही प्रभावीत करु शकतात असेच भाजपा नेत्यांना वाटत आहे असे दिसते,हा विश्वास अत्यंत धक्कादायक आहे. फडणवीस सत्तेवर असतील तरच मराठा आरक्षण मिळेल अन्यथा नाही असे भाजपा नेते सांगत आहेत. अर्णब गोस्वामी सुद्धा फडणवीस यांचाच सल्ला घेतात का? असा टोला सावंत यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात फडकला छत्रपती शिवरायांचा भगवा !
- सत्तेसाठी धडपडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे सामान्य माणूस भरडला : चंद्रकांत पाटील
- ईडीच्या ‘त्या’ नोटीशीचं व साताऱ्यातील पावसाचं रुपांतर सत्तेत झालं : सुप्रिया सुळे
- भारताने मालिका गमावली पण या पट्ठ्यानं मनं जिंकली!
- ‘अब होगी किसान कि बात’ : राहुल गांधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
