Share

अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात फडकला छत्रपती शिवरायांचा भगवा !

Published On: 

सिडनी : स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी, डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच आणि मार्नस लाबुशानेच्या अर्धशतकी खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 389 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 104 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने 83 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, जस्प्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

रविवारी(२९ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना झाला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाज म्हणून पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे त्याने गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून शतकी खेळी करणाऱ्या स्टिव्ह स्मिथची विकेटही घेतली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांवर भारी पडत होते. त्यात स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशाने यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली होती. ही भागीदारी तोडणे कठीण वाटत असतानाच हार्दिक गोलंदाजीसाठी आला आणि त्याने डावाच्या ४२ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर १०४ धावांवर खेळणाऱ्या स्मिथला बाद केले. स्मिथचा झेल मोहम्मद शमीने घेतला.

मात्र एकीकडे भारतीय गोलंदाज सपाटून मार खात दुसरीकडे अभिमाने छाती फुगेल अशी घटना सिडनीच्या क्रिकेट ग्राउंड घडली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील सिडनी येथील दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका मराठमोळ्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाणता राजा असा भगवा झेंडा ऑस्ट्रेलियात फडकावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!