Share

ईडीच्या ‘त्या’ नोटीशीचं व साताऱ्यातील पावसाचं रुपांतर सत्तेत झालं : सुप्रिया सुळे

Published On: 

तळेगाव दाभाडे : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

काल, तळेगाव दाभाडे येथे महाविकास आघाडीतर्फे उमदेवारांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी, राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार सुनिल शेळके, आमदार संजय जगताप, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, शिवसेना तालुकाध्यक्ष राजू खांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

तर, कालच महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली. हाच मुद्दा धरून सुप्रिया सुळेंनी भाजपला टोमणा मारला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावली होती. तर, साताऱ्यात भर पावसात झालेल्या सभेमुळे निवडणुकीने वळण घेत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळवून दिलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘केंद्र सरकारकडून पाठविलेल्या ईडी च्या नोटीस व साताऱ्यातील पावसाचे रुपांतर सत्तेत झाले. ईडीचा पायगुण लय भारी. आता शिवसेनेला ईडीची नोटीस पाठविली आहे, शिवसेनेला आणखी काय मिळेल ते बघावं लागेल. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून पाच नाही तर पंचवीस वर्ष महाविकास आघाडी पूर्ण करेल.’ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक देखील केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!