ऑस्ट्रेलिया : रविवारी खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 390 धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय संघाने 51 धावांनी सामना गमावला आणि यजमान संघाने वनडे सीरिजमध्ये 2-0 ने जिंकली.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरशः भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडवली. अखेर हार्दिक पांड्याने चेंडू हाती घेत सप्टेंबर २०१९ नंतर पहिल्यांदाच गोलंदाजी करत बळी पटकावला. यानंतर, टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने 89 तर केएल राहुलने 76 धावांची झुंजार खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जोश हेझलवूड आणि अॅडम झॅम्पाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मोईसेस हेनरिक्स आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
या सामन्यासह भारताने वन-डे मालिका देखील गमावली. मात्र, या सामन्यामध्ये एक अशी घटना घडली की त्याची चर्चा जगभर होत आहे. एका भारतीय तरुणाने तरुणाने ऑस्ट्रेलियन युवतीला गुडघ्यावर बसून रिंग देत फिल्मी स्टाईल प्रपोज केलं. या प्रपोजला त्या ऑस्ट्रेलियन युवतीने होकार दिला. तसेच घट्ट मिठीही मारली. या जोडप्यासाठी उपस्थित क्रिकेट चाहत्यांनी टाळ्या वाजवल्या. विशेष म्हणजे ग्लेन मॅक्सवेलनेही या जोडप्याचं अभिनंदन केलं. हा सर्व प्रकार सामन्यातील दुसऱ्या डावादरम्यान घडला. ही घटना खूप व्हायरल झाली. अनेक मिम्स देखील आले. कोणता तरी भारतीय ऑस्ट्रेलियात जिंकतोय अशी प्रतिक्रिया अनेकांनी यावर दिली.
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात फडकला छत्रपती शिवरायांचा भगवा !
- सत्तेसाठी धडपडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमुळे सामान्य माणूस भरडला : चंद्रकांत पाटील
- ईडीच्या ‘त्या’ नोटीशीचं व साताऱ्यातील पावसाचं रुपांतर सत्तेत झालं : सुप्रिया सुळे
- ‘ईडी, सीबीआयला सीमेवर पाठवा!; दिल्लीमधील शेतकरी आंदोलनावरुन शिवसेनेचा भाजपला टोला
- ‘५० रुपयांचं रिचार्ज करुन फालतूचं ज्ञान देऊ नको’; दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून कपिलने एका नेटकाऱ्याला चांगलेच फटकारले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

