Share

महाविकास आघाडीचे मंत्री घरात बसून कारभार हाकत आहेत; भातखळकरांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुण्यातील पेपरफुटीप्रकरण चर्चेत असतानाच गेल्या १५ दिवसांत मुंबई पोलीस आणि म्हाडाच्या भरतीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत सहभागी झालेल्या चार तोतया उमेदवारांना अटक करण्यात आली. त्यात पोलीस भरतीतील तीन, तर म्हाडा भरतीमधील एका तोतया उमेदवाराचा समावेश आहे. याप्रकरणी भोईवाडा व पवई पोलीस ठाण्यांमध्ये चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आ. अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘सरकारी नोकर भरतीत तोतया उमेदवारांचा सुळसुळाट झाला असून मुंबईत याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. एक परीक्षा धड घेता येत नाही. प्रशासनावर कोणाचा वचक नाही. मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री घरातून पोलिसांच्या बदल्या करतात. परिवहन मंत्री गृहखाते चालवतात. अराजक आणखी वेगळे काय असते?’ अशी टीका भातखळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी परीक्षेत स्वत:ऐवजी तोतया उमेदवारांना सहभागी केल्याप्रकरणी गेल्या १५ दिवसांत तीन तरुणांना भोईवाडा पोलिसांनी अटक केली. भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी जालना येथील रहिवासी भगवान टकले (२४) याला गुरुवारी अटक केली. मरोळ पोलीस मैदानात ८ डिसेबर, २०२१ रोजी झालेल्या शारीरिक चाचणी परीक्षेस त्याने स्वत:ऐवजी विशाल गुसिंगे या तरुणाला बसविले होते.

कागदपत्रांच्या छाननीत हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी टकलेसह गुसिंगे यांच्याविरोधात बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात पोलीस भरतीतील शारिरीक चाचणीमध्ये तोतया उमेदवार बसविल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सतीश मोरे या औरंगाबादमधील तरुणाला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अटक केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!