🕒 1 min read
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (४ फेब्रुवारी) गोरखपूर शहर मतदारसंघातून आपला निवडणूक अर्ज भरला. यावेळी त्यांनी शपथपत्रात आपल्याकडे जवळपास १.५५ कोटी रुपयांची संपत्ती असून स्वतःच्या नावावर एकही जमीन, घर आणि गाडी नाही. पण एक रिव्हॉल्वर आणि रायफल आहे असे नमूद केले. त्यांचा फोटो पोस्ट करत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath)यांचे कौतुक केले आहे.
“योगीजींकडे जमीन, घर अन् गाडीही नाही, पण ते रिव्हॉल्वर आणि ‘रायफल’धारी संन्यासी आहेत. त्यांना…. शास्त्र पण माहिती आहे आणि शस्त्र पण माहिती आहे. एका हातात माळा तर दुसऱ्या हातात भाला ठेवतात”, असे ट्वीट अतुल भातखळकर ( BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी केले आहे.
योगीजींकडे जमीन, घर अन् गाडीही नाही.., पण ते आहेत रिव्हॉल्वर आणि 'रायफल'धारी संन्याशी आहेत.
संन्यासी हूं… शास्त्र भी जानता हूं शस्त्र भी जानता हूं। एक हाथ से माला जपता हूं तो दूसरे हाथ में भाला रखता हूं। pic.twitter.com/ULkyI7TvPL— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 5, 2022
दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्याकडे असलेल्या संपत्तीपैकी बहुतांश संपत्ती ही कॅश आणि बँक बॅलेन्सच्या रुपात आहे. त्यांच्याकडे एक सॅमसंग मोबाईल फोन असून त्याची किंमत १२ हजार रुपये इतकी आहे. तसेच त्यांच्याकडे एक लाख रुपयाचे एक रिव्हॉल्व्हर आणि ८० हजार रुपयांची एक रायफल देखील आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राहुल गांधींचे टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच- संजय राऊत
- ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टिन लँगर यांनी दिला राजीनामा
- “यह मोदी सरकार है…कोई नही बचेगा”, मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपीच्या अटकेवर भाजपची प्रतिक्रिया
- महाशिवरात्रीपूर्वी येणार अमृता फडणवीसांचे नवे गाणे
- बंडाचा केव्हा ‘सय्यद बंडा’ झाला कळलेच नाही- अमोल मिटकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
