मुंबई : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्याची घोषणा माध्यमांद्वारे केली. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सिजन बेड्स फक्त २५ टक्के व्यापलेले असतील तिथे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अगदी थिएटर्स पासून ते सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने तेही उद्यापासूनच सुरु करणार असल्याचे जाहीर केले.
यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, आता याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसून याबाबत स्थानिक स्तरावर आढावा घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, हा निर्णय अद्याप विचाराधीन असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आधी घोषणेची घाई नंतर निर्णय मागे घेतल्याची घाई. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्य सरकारच्या सावळ्या गोंधळावर आता भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, ‘अंधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था राज्याची महाआघाडी सरकार करत आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही विजय वडेट्टीवार प्रेस घेऊन अनलॅाकडाऊन केल्याची घोषणा करतात. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात, काहीवेळानतंर सरकारी प्रेसनोट येते अनलॅाकडाऊनचा प्रस्ताव आहे निर्णय नाही,’ असं ट्विट करून निशाणा साधला आहे.
अंधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था राज्याची महाआघाडी सरकार करत आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही @VijayWadettiwar प्रेस घेऊनअनलॅाकडाऊन केल्याची घोषणा करतात. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीतबैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात, काहीवेळानतंर सरकारी प्रेसनोटयेते अनलॅाकडाऊनचा प्रस्ताव आहे निर्णय नाही pic.twitter.com/BRuLOCaP8G
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 3, 2021
राज्य सरकारच स्पष्टीकरण –
कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.
अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
- सिल्लोड आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर उपासमाची वेळ, दुकाने सुरु करण्याची मागणी
- कोरोनामुळे आई-बहिणीला गमावल्यानंतर वेदा कृष्णमुर्तीने पहिल्यांदाच व्यक्त केली भावना, म्हणाली..
- पावसाळ्याच्या तोंडावरच औरंगाबादेत विजेचा लपंडाव सुरू, महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- ‘विधानसभेतील पराभव अल्पविराम आहे, पुर्णविराम नाही’, धनंजय मुंडेंकडून पराभूत झालेल्या प्रकारावर पंकजा मुंडेंचे भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

