Share

पावसाळ्याच्या तोंडावरच औरंगाबादेत विजेचा लपंडाव सुरू, महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : नुकताच जून महिना सुरु झाला आहे. यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस बरसणार असल्याचे हवामान तज्ज्ञांद्वारे सांगण्यात आले आहे. शहरातही पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आत्तापर्यंत झालेल्या दोन ते तीन पावसामध्येच शहरातील अनेक भागांमध्ये वीज गुल होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यामुळे वर्क फ्रॉम होम तसेच इतर सर्वांची देखील मोठी गैरसोय होत आहे. नुकत्याच सुरु झालेल्या पावसाळ्यामुळे सर्रास वीज जात असल्याने वादळवाऱ्यात शहरातील ९९ टक्के भाग अंधारात जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी महावितरणद्वारे वीज जोडणी, अनधिकृत तारा कट करणे, जोडणी इत्यादी धोकादायक कामे केली जातात. मात्र हि कामे व्यवस्थित होत नसल्याने तसेच अपुरे कर्मचारी, अयोग्य व्यवस्थापन, सुरक्षिततेची कमतरता या कारणांमुळे पावसाळा पूर्व कामे व्यवस्थित होत नाहीत. याचमुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बत्ती गुल होत आहे.

काल झालेल्या पावसामुळे शहरातील हर्सूल, जटवाडा, मुकुंदवाडी, पडेगाव इत्यादी भागांमध्ये वीज गायब होती. हर्सूल भागात तर रात्रभर विजेचा लपंडाव सुरु होता. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार याठिकाणी नेहमीच पावसाळा सुरु होत नाही तो वीज जाण्यास सुरुवात होते. वीज तारांजवळ येणाऱ्या झाडांची छाटणी करणे, वीजपुरवठा करणाऱ्या उपकरणांची पाहणी करणे, झुकलेले तसेच जीर्ण विजेचे पोल दुरुस्त करणे, अशी अनेक कामे व्यवस्थित झालेली नाहीत. यातील काही कामे झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकदा रात्री महावितरणच्या ऑफिसमध्ये कर्मचारी उपस्थित नसतात, अशीही नागरिकांची ओरड आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!