Share

शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..

Published On: 

मुंबई : २ जुनपासुन इंग्लंड येथील लॉर्ड्स या मैदानावर इंग्लंड आणि न्युझीलंड या दोन्ही संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्युझीलंडचे वर्चस्व राहिले. पहिल्या दिवसाआखेर न्युझीलंडच्या संघाने ८६ षटकात ३ गडी गमावत २४६ धावांची मजल मारली.

या सामन्यात न्युझीलंडकडुन डेवॉन कॉनवेने पदार्पण केले. आपल्या पदार्पणातच कॉनवेने शतकी खेळी करत लॉर्ड्सवर पदार्पणात सर्वाधीक धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला. त्याच्या या खेळीनंतर सगळीकडे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची चर्चा होत आहे. कारण यावेळी कॉनवेने पदार्पणात शतकी खेळी करत सौरव गांगुलीचा २५ वर्ष जुना विश्वविक्रम मोडला. मात्र गोष्ट इथेच थांबत नाही. डेवॉन कॉनवे आणि सौरव गांगुली दोघांचा वाढदिवस हा एकाच दिवशी म्हणजे ८ जुलै रोजी असतो. मात्र दोघांच्या वयात १९ वर्षाचा फरक आहे.

सौरव गांगुलीने १९९६ मध्ये लॉर्ड्स येथे कसोटी पदार्पण केले होते. या पदार्पणात त्याने १३१ धावांची खेळी केली होती. मागील २५ वर्षापासुन हा विक्रम अबाधीत होता. मात्र नुकत्याच सुरु झालेल्या इंग्लंड- न्युझीलंड मालिकेत हा विक्रम मोडण्यात आला. न्युझीलंड संघाचे इतर फलंदाज अपयशी होत असताना कॉनवेने २४० चेंडुचा सामना करताना १६ चौकराच्या साहाय्याने १३६ धावांची नाबाद खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!