मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवरांना या विषाणुची लागण झाली आहे. कोरोनाच्या या संसर्गामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू वेदा कृष्णमुर्तीच्या आई आणि बहिणीचे निधन झाले होते.
आई आणि बहिणीला गमावल्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वेदाने भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना वेदा म्हणाली,’आईच्या निधनानंतर मला माझ्या नशीबावर विश्वास होता वाटले होते की बहिण नक्कीच घरी येईल पण माझा विश्वास खोटा ठरला. आणि माझी बहिण मला कायमचे सोडुन गेली. तिच्या जाण्याने मी आतमधुन पुर्णपणे खचली होती. मात्र कुटुंबातील इतर सदस्यामुळे मला त्यांना धिर देण्यासाठी स्वत:चे दु:ख विसरावे लागले.’ वेदा ही तिच्या कुटुंबातील एकमेव व्यक्ति होती जिला कोरोनची लागण झाली नाही.
भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू वेदा कृष्णमुर्तीच्या कुटुंबीयांना काही दिवसापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरनाची लागण झाल्यानंतर काही दिवसात वेदाच्या आईचे निधन झाले. आईच्या दु:खातून सावरण्याआधी तिच्या बाहिणीचाही कोरोनामुळे मृत्यु झाला होता. त्या काळात तिच्या कुटुंबात एकुण ९ जणाना कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू लिसा स्थळेकरने बीसीसीआयने तिला संपर्कही केला नाही असा आरोप केला होता. मात्र वेदाने या आरोपात काही तथ्य नसल्याचे वेदाने स्पष्ट केले होते.
महत्वाच्या बातम्या
- सिल्लोड आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर उपासमाची वेळ, दुकाने सुरु करण्याची मागणी
- धक्कादायक! प्रियकराने केला प्रेयसीचा खून!
- पावसाळ्याच्या तोंडावरच औरंगाबादेत विजेचा लपंडाव सुरू, महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
- शतक कॉनवेचे; चर्चा मात्र दादाची! जाणून घ्या काय आहे कारण..
- त्रिमूर्ती चौकातील ‘त्या’ झोपडीवर अतिक्रमण हटाव पथकाचा हातोडा, आजीबाई झाल्या बेघर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

