औरंगाबाद : सिल्लोड येथील सर्व भाजीपाला व आठवडी बाजारातील व्यापारी शेतकरी यांना बाजार पट्टी मध्ये सोशल डिस्टंसिंग चा वापर करून दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात यावी व गोरगरीब शेतकरी छोटे व्यापारी यांना होणारी उपासमार थांबवावी या आशयाचे निवेदन सिल्लोड नगर परिषद मुख्याधिकारी व सिल्लोड तहसीलदार राजपूत साहेब यांना देण्यात आले आहे.
आठवडी बाजार मागील एका महिन्याभरापासून बंद असून, सर्व आठवडी बाजारातील व्यापारी किरकोळ भाजीपाला व्यापारी शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांची उपासमार होत असून विक्रेत्यांना प्रति महिना पंधरा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच आठवडी बाजार आठ दिवसाला न भरवता पंधरा दिवसातून एक वेळेस भरण्यास परवानगी देण्यात यावी. यासार्व गोष्टींना सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम घालून परवानगी देण्यात यावी व भाजी मंडी मध्ये चार-पाच विक्रेत्यांनाच बसण्यास परवानगी न देता भाजीपाला विक्रेते, सर्व व्यापारी यांना आठवडी बाजाराच्या जागेवर बसण्यास परवानगी देण्यात यावी असे निवेदन दादाराव आळणे प्रदेश सचिव भाजपा ओबीसी मोर्चा यांच्या नेतृत्वात देण्यात आले आहे.
निवेदनावर कौशल्याबाई खेडकर ,सुनीताबाई मीरा ,दिलीप पाडळे, साहेबराव वाघ ,पंकज बंडू कांबळे ,प्रवीण पाडळे, शारदाबाई दिलीप ,भुजंगराव गायकवाड ,गणेश वानखेडे, मंगेश आरके, सारिका बाई सागर वाडे ,सोनू वाडे ,सिताराम वराडे ,योगेश गायकवाड ,अमजद खान, संजय लोखंडे, एकनाथ वानखेडे, शरद बावणे, रखमाजी केसापुरे, सागर सोनवणे ,कैलास दांडगे, मधुकर मोरे, गोपाल आहेर ,दिलीप अग्रवाल, शेख समीर, गणेश वानखेडे, आदींच्या सह्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- राज्याच्या जीएसटी वसुलीत मोठी घट, लॉकडाऊनच्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेला फटका
- दीपिका सिंह नव्या डान्स व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर झाली ट्रोल…
- अंकिता लोखंडेचा चाहत्यांना ‘गुड बाय’ ; पोस्ट शेअर करत दिली माहिती
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’

