Share

‘विधानसभेतील पराभव अल्पविराम आहे, पुर्णविराम नाही’, धनंजय मुंडेंकडून पराभूत झालेल्या प्रकारावर पंकजा मुंडेंचे भाष्य

Published On: 

🕒 1 min read

बीड : २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून तत्कालीन भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना पराभूत केले. यामुळे पंकजा मुंडे समर्थकांना मोठा धक्का बसला. शिवाय पंकजा याही नाराज झाल्या. अनेक दिवस त्या पक्ष आणि माध्यमांपासून दूरही राहिल्या. पण कालातंराने राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्या. मात्र, त्या पराभवाचे शल्य आजही त्यांच्या मनात असल्याचे आज घडलेल्या प्रसंगावरून दिसत आहे.

भाजपचे दिवंगत नेते तसेच लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीटचं अनावरण करण्यात आलं. या निमित्ताने गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते या कार्यक्रमात सहभागी झाले. या वेळी पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भावना मांडल्या. आज गोपीनाथ मुंडे साहेब असते तर मराठा समाजाला आरक्षणासाठी दारोदारी फिरायची वेळ आली नसती, असे मत यावेळी त्यांनी मांडले.

पंकजा म्हणाल्या, ‘मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी वेळ मागून आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. विधानसभेतील पराभव हा अल्पविराम आहे पुर्णविराम नाही. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार फक्त राजकारण करत आहे. सरकारने मराठा समाजाची चेष्टा केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वांनी आपापल्या पोळ्या भाजायचे काम केले आहेत, निवडणुका जवळ आल्या की समाजाचं पुळका येतो, अशा शब्दांमध्ये पंकजा मुंडेंनी विरोधकांवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!