मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा तडाखेबाज खेळाडू युसूफ पठाणने आज सर्व प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. भारताकडून 57 एकदिवसीय आणि 22 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या युसुफला गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुनरागमन करण्याची प्रतीक्षा होती. मात्र, अखेर आज त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
युसूफ पठाणचे भावनिक पत्र –
‘मी माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला साथ दिली आणि खूप प्रेम दिले.’ असं म्हणत त्याने आभार व्यक्त केले आहेत. पुढे त्याने त्याच्या प्रदार्पणाची आठवण देखील सांगितली आहे.
“मला आजही आठवतंय जेव्हा मी प्रथम भारतीय जर्सी घातली होती, त्यादिवशी मी फक्त इंडियाची जर्सी घातलेली नव्हती तर माझे कुटुंब, मित्र, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाच्या स्वप्नांना माझ्या खांद्यावर घेतलं होतं. मी लहानपणापासूनच क्रिकेटमध्येच माझे आयुष्य व्यतीत केले आहे. मी माझ्या कारकीर्दीत देशाकडून खेळलो, घरगुती क्रिकेट खेळलो आणि आयपीएलमध्येही खेळलो.”
I thank my family, friends, fans, teams, coaches and the whole country wholeheartedly for all the support and love. #retirement pic.twitter.com/usOzxer9CE
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) February 26, 2021
पुढे त्याने आपल्या कारकिर्दीतील अविस्मरणीय आठवणींना देखील उजाळा दिला आहे. ‘भारतासाठी दोन वर्ल्ड कप जिंकणं आणि सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन जाणं हे माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण होते. मी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएलमध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वात डेब्यू केलं. तसेच आयपीएलमध्ये कोलकातासाठी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा विजेतपद पटकावलं, यासाठी गौतम गंभीरचा मी आभारी आहे’ असं आवर्जून त्याने नमूद केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नथुराम गोडसेच्या कट्टर समर्थकाचा कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘राजसाहेब शिवजयंतीला शुभेच्छा द्यायला विसरले, परंतु सावरकरांना मात्र आवर्जून अभिवादन केले’
- ‘मराठी दिनाच्या कार्यक्रमावर बंदी, मात्र हजारोंची गर्दी जमावणाऱ्या राठोडांवर कारवाई नाही’
- प्रतिष्ठा पणाला…पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; आठ टप्प्यांत होणार निवडणूक
- खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे; रुपाली ठोंबरे यांची विखारी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

