🕒 1 min read
मुंबई : मराठी भाषेच्या वापरासाठी आजही आंदोलने करावे लागतात हे ही सत्य आहे. काही दिवसांपूर्वीच अमेझॉन ऍप व वेबसाईट वर मराठी भाषेचा पर्याय देण्यात यावा यासाठी मनसेने आंदोलन केले होते. उद्या २७ फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा दिन ! विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला देदीप्यमान इतिहास रचणाऱ्या थोर व्यक्तींचा परीस स्पर्श लाभला आहे.
यामुळेच मराठी भाषेसाठी आग्रही असलेल्या मनसेने कोरोनाचे सर्व नियम पाळत ‘मराठी स्वाक्षरी’ मोहिमेचे आयोजन केले होते. मनसेच्या या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. अमेय खोपकर यांनी कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम करणारच असा पवित्रा घेतला आहे. त्यांनी, ‘वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे हजारोंचा जनसमुदाय जमवला, मात्र राठोडांवर काहीही कारवाई का केली नाही ? ‘ असा सवाल खोपकरांनी केला आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) February 26, 2021
‘कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने जी नियमावली आखून दिलेली आहे, त्या नियमांचं काटेकोर पालन करुन मनसेने ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारने या कार्यक्रमाला कोविड प्रसाराचं कारण देत परवानगी तर नाकारलीच, वर कारवाईचा धाक दाखवला. ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोडसारख्या मंत्र्याचे समर्थक हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात ‘मराठी भाषा दिवस’ का खुपतो? महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तबच झालंय, पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की हे सरकारच ‘अमराठी’ आहे की काय? आम्ही हे ठणकावून सांगतो की नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच,’ असा निर्धार अमेय खोपकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नथुराम गोडसेच्या कट्टर समर्थकाचा कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
- नितीन गडकरी म्हणाले, ‘या’ गोष्टीची होणार ‘लिम्का बुक’मध्ये होणार नोंद
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री खरच नाराज आहेत की त्या फक्त पेरलेल्या बातम्या होत्या ?
- खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे; रुपाली ठोंबरे यांची विखारी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
