Share

‘राजसाहेब शिवजयंतीला शुभेच्छा द्यायला विसरले, परंतु सावरकरांना मात्र आवर्जून अभिवादन केले’

Published On: 

मुंबई- आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतिदिन आहे.देशभरातून अनेक नेते,सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह दिग्गजांनी त्यांना अभिवादन केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आज स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्मृतीदिनी अभिवादन केले आहे.

आज सावरकरांना अभिवादन करताना ते म्हणतात,स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक, हिंदू संघटक होतेच पण कमालीचे विज्ञाननिष्ठ आणि क्रियाशील धर्मसुधारक आणि समाजसुधारक देखील होते. स्वातंत्र्य आणि सुराज्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या स्वातंत्र्यवीराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.दरम्यान,  हे अभिवादन केल्यावर त्यांना काही प्रमाणात ट्रोल केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

https://twitter.com/abey_satya/status/1365167197170008066?s=20

शिवजयंती तिथीनुसार केली जावी कि तारखेनुसार याबद्दल बऱ्याच वर्षांपासून वादविवाद सुरु आहेत.पुरोगामी म्हणवून घेणारे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करतात तर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे तिथीनुसार साजरी करतात. तिथी की १९ फेब्रुवारी असा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा विषय येतो तेव्हा ३६५ दिवस जयंती साजरी करायला हवी, असे राज ठाकरे म्हणतात. मग १९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त महाराजांना अभिवादन का करावे असे वाटले नाही असा बेसिक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. ठाकरे यांनी १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या शिवजयंती दिनी शिवरायांना अभिवादन केले नसल्याने नेटीझन्स त्यांची खिल्ली उडवताना दिसून येत आहेत.

दरम्यान, जे सावरकर शिवरायांना आपला आदर्श मानत होते त्यांना १९ तारखेला अभिवादन करायला राज ठाकरे कसं काय विसरले हे एक कोडे आहे. चाणाक्ष नेटीझन्सनी नेमका हाच मुद्दा लावून धरला असून काहींनी जर शिवजयंतीचा विसर पडला असेल तर निवडणुकीतील सभेच्यावेळेस स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या ऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकररांचा पुतळा ठेवून त्यास हार घालावा आणि निवडणूक लढवाव्यात असा सल्ला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!