पुणे : ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप होत असून कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील आता समोर आले आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
मात्र, संजय राठोड यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून अद्यापही ते पदावर कायम आहेत. या प्रकरणावर मनसे नेत्या रुपाली ठोंबरे यांनी भाष्य करत संजय राठोड यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ‘वनमंत्री संजय राठोड याला लाज वाटायला हवी वाटली पाहिजे. नैतिकता म्हणून तुम्ही त्या पदावर राहूच नये, जनांची नको मनाची तरी लाज ठेवा,’ अशी खोचक टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.
‘जे पुणे पोलिसांना नाही समजले ते सर्व जनतेला कळाले आहे. खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे. आपण एक लोकप्रतिनिधी असून त्यांनी जवाबदारीने वागणे गरजेचेच होते. अश्या पध्दतीचे शेण खाऊन समाजात घाण पसरवत आहे. गरीब मुलीच्या आयुष्यच वाटोळे करत आहेत. नैतिकता म्हणून तुम्ही त्या पदावर राहूच नये, जनाची नको मनाची लाज ठेवा.’ असा प्रहार रुपाली ठोंबरे यांनी केला आहे.
तर, ‘पैशाच्या जोरावर अवघी 20 ,22 वर्षाची मुलगी भुलवता किंवा ती भुलली ही पुजाची चूकच आहे. तिला समजवणारे, चांगले सांगणारे भेटलेच नसतील पण तुमचे काय तुम्ही तर जेष्ठ नेते ,लोकप्रतिनिधी आहात ना, तुम्हाला अक्कल नव्हती का? का तुम्ही वेळीच पूजा रोखले नाही, लांब केले नाही. तुमच्या कृत्याची आमच्या लेकी बाळींना चुकीचे ,घाण दाखले नकोत. नैतिकता म्हणून तुम्ही त्या पदावर नसले पाहिजे. आपली पात्रता नाही त्या पदावर राहण्याची,’ अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आपली मराठी भाषा अजिबात लेचीपेची नाही; वाचा मराठी राजभाषा दिनानिमित्त राज ठाकरेंचं खास पत्र !
- मीडियाला हात जोडून विनंती! पूजाचे पर्सनल फोटो दाखवू नये, लेकींवर चुकीचा परिणाम होतोय !
- ‘बदनामी करू नका, अन्यथा आम्हालाही जीव द्यावा लागेल’, पूजाच्या बहिणीचे भावनिक आवाहन
- मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दहा हजार रूपये प्रति हेक्टरी मिळालेच नाहीत?
- परभणीत चिंता वाढली! ४१ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
