पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
सद्या, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार आहे. आता, बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगलामध्ये एकूण आठ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडेल. तर आठ टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर २ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे.
असा आहे पश्चिम बंगालचा निवडणूक कार्यक्रम –
- पहिला टप्पा – 27 मार्च
- दुसरा टप्पा – 1 एप्रिल
- तिसरा टप्पा – 6 एप्रिल
- चौथा टप्पा – 10 एप्रिल
- पाचवा टप्पा – 17 एप्रिल
- सहावा टप्पा – 22 एप्रिल
- सातवा टप्पा – 26 एप्रिल
- आठवा टप्पा – 29 एप्रिल
महत्त्वाच्या बातम्या
- नथुराम गोडसेच्या कट्टर समर्थकाचा कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘राजसाहेब शिवजयंतीला शुभेच्छा द्यायला विसरले, परंतु सावरकरांना मात्र आवर्जून अभिवादन केले’
- ‘मराठी दिनाच्या कार्यक्रमावर बंदी, मात्र हजारोंची गर्दी जमावणाऱ्या राठोडांवर कारवाई नाही’
- संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री खरच नाराज आहेत की त्या फक्त पेरलेल्या बातम्या होत्या ?
- खरी लाज वनमंत्री संजय राठोड याला वाटली पाहिजे; रुपाली ठोंबरे यांची विखारी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

