Share

नथुराम गोडसेच्या कट्टर समर्थकाचा कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

भोपाळ – राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो असं म्हणतात याचाच प्रत्यय काल मध्य प्रदेशात आला. हिंदू महासभेकडून निवडणूक लढविणारे आणि नथुराम गोडसेची पूजा करणाऱ्या एका नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर पालिकेचे नगरसेवक आणि हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरसिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. सन २०१७ मध्ये नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेचे उद्घाटन करणाऱ्यांमध्ये बाबूलाल चौरसिया यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची शपथ घेतल्यामुळे ते चर्चेत आले होते. नगरसेवक बाबुलाल चौरसिया यांच्या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते.

नथुराम गोडसेंवरील वक्तव्यावरून काँग्रेसने भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. पण आता चौरासिया यांना पक्षात प्रवेश देण्यात काँग्रेसला कुठलीही अडचण दिसत नाहीए. पण पक्षाचे नेते मानक अग्रवाल यांनी चौरासिया यांच्या प्रवेशावरून कमलनाथ यांचा बचाव केला.

गोडसेची पूजा करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश सहभागी करून घ्यायला नको. आम्ही या विरोधात आहोत. कमलनाथ यांना पूर्ण माहिती नसेल. यामुळे त्यांनी चौरासिया यांना पक्षात प्रवेश दिला असावा. पण याचा विरोध केला जाईल, असं मानक अग्रवाल म्हणाले.

दरम्यान,याबाबत चौरासिया म्हणाले की, हिंदू महासभेनं मला अंधारात ठेवून गोडसेची पूजा करून घेतली होती. गेल्या दोन तीन वर्षांपासून यापासून मी स्वत:ला दूर ठेवलं होतं. माझ्या मनाला हिंदू महासभेची विचारसरणी पटली नाही. मी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलो होतो आणि जिंकलोही होतो. निवडणुकीत जेव्हा तिकिट कापलं आणि हिंदू महासभेनं त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्यास सांगितलं तेव्हा मी अर्ज दाखल केला. मात्र आता मी माझ्या कुटुंबात परत आलो आहे अशी भावना चौरासियांनी व्यक्त केली.

दरम्यान,कॉंग्रेसमधून काही नेत्यांनी त्यांचा बचाव देखील केला आहे. “याआधी ते काँग्रेसमध्ये होते. हिंदू महासभेकडून निवडणूक लढत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. आमचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलं आहे. गांधी कुटुंब किती मोठ्या मनाचं आहे. त्यांच्या याच आदर्श मूल्यांमुळे आज गोडसेची पूजा करणारा व्यक्ती गांधींची पूजा करत आहे,” असं ग्वालियरमधील काँग्रेस आमदार प्रवीण पाठक यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!