औरंंगाबाद : भरधाव जाणा-या फोरच्र्युनर कारने दिलेल्या धडकेत कारमधील तीन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दौलताबाद गावाजवळ घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक पोपटराव खोसरे (वय ४७), राजू आसाराम मानकीकर (दोघे रा.गल्लेबोरगांव), मदन अशोक जगताप (वय २८, रा.मुकुंदवाडी) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर राजू वरकड (रा.मावसाळा, ता.खुलताबाद), सुनिल औटे असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेले राजू वरकड, सुनिल औटे, दिपक खोसरे, राजू मानकीकर, मदन जगताप हे सर्व कार क्रमांक (एमएच-२०-डीजे-१७७१) मधुन खुलताबादकडे जात होते. त्यावेळी खुलताबादकडून भरधाव वेगाने येणा-या फोच्र्युनर कार क्रमांक (एमएच-२०-सीएस-५४६२) ने वरकड यांच्या कारला जोराची धडक दिली.
या अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप बचाटे, पोलिस अंमलदार पी.डी.पचलोरे, के.पी.कांबळे, शरद बच्छाव, प्रभाकर पाटेकर, सचिन त्रिभुवन, नईम सय्यद आदींनी घटनास्थळी धाव घेवून कारमधील जखमी झालेल्यांना उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दिपक खोसरे, राजू मानकीकर, मदन जगताप यांना तपासून मयत घोषीत केले. तर गंभीर जखमी झालेल्या राजू वरकड, सुनिल औटे यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून फोरच्र्युनर कारचालकाविरूध्द दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने घोषणा केली ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अन् दिले २६ हजारच; मंत्री शिंगणेंची माहिती
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- ‘रजनी सर म्हातारे होत आहेत म्हणून…’ जडेजाच्या कामगिरीनंतर धोनीचे ट्विट व्हायरल
- इशारा काय देता ? बदनामीचा खटला दाखल कराच; मुश्रीफांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान


