Share

‘रजनी सर म्हातारे होत आहेत म्हणून…’ जडेजाच्या कामगिरीनंतर धोनीचे ट्विट व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेत अंजिक्य असलेल्या बेंगळुरु रॉयल चॅलेजंर्स संघाला चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने ६९ धावांनी नमवले आणि पराभवाची धुळ चारली. चेन्नईने दिलेल्या १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी केवळ १२२ धावांपर्यंत मजल मारु शकला. रविंद्र जडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगीरीमुळे सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यातील कामगीरीमुळे सर्वस्तरातुन रविंद्र जडेजाचे कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमिवर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे ८ वर्षापुर्वीचे ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये धोनीने लिहीले आहे की, ‘रजनी सर म्हातारे होत आहेत याची देवाला जाणीव झाली आणि त्याने सर रविंद्र जडेजा यांना बनवले.’ हे ट्विट कालच्या कामगीरीनंतर व्हायरल होत आहे. हे ट्विट शेअर करत अनेक चाहत्यांनी धोनीच्या वक्तव्याला सहमती दर्शवली आहे.

या ट्विटमध्ये धोनीने जडेजाचा उल्लेख हा सर रविंद्र जडेजा असा केला आहे. त्यामुळे ट्रेंडमध्ये सर रविंद्र जडेजा हे आहे. जसे क्रिकेट रसिक धोनीला माही, रोहितला हिटमॅन आणि कोहलीला रणमशीन म्हणतात. आगदी त्याप्रमाणे जडेजाला ‘सर रविंद्र जडेजा’ ही उपाधी दिली आहे. आयपीएल २०२१ मध्ये अष्टपैलू जडेजा तुफान फॉर्ममध्ये असुन पहिल्या सामन्यापासूनच अष्टपैलू कामगिरीची चुणूक दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!