रत्नाागिरी – भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. रत्नागिरी येथील भाजपा कार्यालयात रविवारी निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत डॉ.स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या मुद्यांवरून संजय राऊत यांच्यावर टीका केली.
राणे म्हणाले, राऊतांविरोधात एका महिलेने तक्रार केली आहे. अनेक महिन्यांपासून ही महिला न्याय मागत आहे. त्यांच्याकडे राऊतांविरोधात पुरावे आहेत. या महिलेने खा.सुप्रिया सुळे यांच्याकडेही न्याय मागितला आहे. मग कारवाई का होत नाही? असा सवाल त्यांनी केला. एका महिलेला अश्लिलप्रकारे छळणारा व्यक्ती ताठमानेने फिरू कसा शकतो? त्यांना अटक झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवसेना खासदार संजय राऊत हा विकृत मनोवृत्तीचा माणूस असल्याचा घणाघात निलेश राणे यांनी केला. कोणताही विषय असो त्यावर भाष्य करणाºया संजय राऊत याच्या विरोधात एका महिलेने तक्रार करूनही तीला अद्याप न्याय मिळालेला नाही. या महिलेला गेली कित्येक वर्षे हा राऊत त्रास देत आहे. तीने मुंबई पोलीस आयुक्त, रा खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडलेली आहे, तक्रार केलेली आहे. मग सरकार आणि पोलीस राऊत याच्या विरोधात का कारवाई करत नाही असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.
आपणही त्या महिलेशी बोललो आहे, त्या महिलेने राऊत त्यांच्या कुकर्माचा पाढा वाचला आहे आपल्यासमोर, त्या महिलेच्या घराभोवती पाळत ठेवणे, गुंड पाठवून दहशत निर्माण करण्याचे काम हा राऊत करत आहे. या महिलेवर पाळत ठेवली जाते, तीला अश्लील व्हीडिओ पाठविले जातात, तीचा मानसिक छळ केला जातो, एवढं सारं घडूनही सरकार आणि पोलीस मग गप्प का? जर उद्या या महिलेने आपल्या जीवाचं बरं वाईट केलं तर मग त्याला जबबादार कोण? सरकार याची जबाबदारी घेणार काय असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली – भरणे
- ‘…तर भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल’; चंद्रकांतदादांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
- टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
- ‘पवारांचे बस्तान बसविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आडून सोलापूर जिल्ह्याचा दिला जातोय बळी’
- मलिक, राऊत आणि आव्हाड महाराष्ट्राच्या जनतेची आणि मोदींची माफी मागतील का?


