Share

उघड्या घरातून मोबाइल चोरणारे दोघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : उघड्या घरातून मोबाइल चोरणा-या दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. या चोरांकडून पोलिसांनी तब्बल बारा मोबाइल जप्त केले आहेत. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी सिडकोतील सावरकर चौकात करण्यात आली. फेरोज खान अब्दुल शेख बादशहा (३०, रा. बायजीपुरा) आणि सिकंदर शहा वसीम शहा (३८, रा. शहा कॉलनी, बाजार गल्ली, खुलताबाद) अशी दोघांची नावे आहेत.

मोबाइल विक्री करण्यासाठी दोन जण सावरकर चौकात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरुन पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे, सहायक फौजदार नजीर पठाण, जमादार सुधाकर मिसाळ, नवसारे, पोलीस नाईक अश्वलिंग होनराव, डाखोरे, जायभाये आणि चालक गायकवाड यांनी सापळा रचून त्यांना अटक केली.

पिशवीत विक्री करण्यासाठी आणलेले बारा मोबाइल शेख फेरोज आणि सिकंदर शहा यांच्याकडून जप्त करण्यात आले. या दोघांना सध्या मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!