मुंबई : इंग्लंड आणि भारत संघादरम्यान लॉर्ड्स येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव ३९१ धावांवर अटोपला. यासह इंग्लंडने पहिल्या डावात भारताविरुद्ध २७ धावांची निसटती आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा पहिला डाव ३९१ धावांवर संपुष्टात आला.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील लॉर्ड्स कसोटीत सलामीवीर के एल राहुलने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. त्याच्या या शतकामुळे इतर खेळाडूसाठी पुनरागमनाची वाट खडतर झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावरून दुखापतीमुळे बाहेर झालेला शुभमन गील आणि सध्या इंग्लंडमध्ये असलेले पृथ्वी शॉ, मंयक अग्रवाल सलामीचे फलंदाज आहे. मात्र दुखापतीच्या कारणामुळे हे तिनही खेळाडू संघाबाहेर झाले आहे.
यादरम्यान तीन वर्षानंतर मिळालेल्या संधीचा फायदा उचलत के एल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ८४ आणि २६ तर दुसऱ्या कसोटीत १२९ धावांची शतकी खेळी केली. राहुलच्या या खेळीमुळे सलामीवीराच्या जागेसाठी त्याने दावेदारी पक्की केली आहे. त्यामुळे या खेळाडूंना दुसऱ्या स्थानासाठी संघर्ष करावा लागु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी
- ‘फाळणीने देशाला मोठी जखम, म्हणूनच ‘फाळणी भयस्मृती दिन’ साजरा करणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

