औरंगाबाद : वैजापूर येथील स्थानिक पोलीसांनी दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना गजाआड केले असून त्यांच्या ताब्यातून सहा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दादासाहेब काशीनाथ नवगीरे व विशाल भारत म्हस्के रा.पानगव्हाण अशी आरोपींची नावे आहेत.
वैजापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्हृयाचा तपास चालू होता. चोरी गेलेल्या दुचाकी शोध घेत असताना पोलीस स्टेशन वैजापूर येथील डीबी पथकाचे पीएसआय जाधव, पोलीस नाईक जालिंदर तमनर, पोलीस अंमलदार विशाल पैठणकर, यांचे पथकाने माहिती काढून सदरच्या दुचाकी पानव येथील इसम नामे दादासाहेब काशिनाथ नवगिरे (२२) याने चोरी केले असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सदर इसमास ताब्यात घेऊन कसोशीने विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याचा मित्र विशाल भारत मस्के रा.पानगव्हाण ता.वैजापूर यांचे मदतीने चोरी केल्याची कबुली देऊन त्यांनी सदर गुन्ह्यात चोरी गेलेल्या दोन दुचाकी व वैजापूर शहरातून इतर ठिकाणावरून चोरी गेलेल्या ७ दुचाकी चोरल्या असल्याची कबुली दिली. पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातून ६ दुचाकी हस्तगत केल्या आहे. आणखी दुचाकी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून ही कामगिरी निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- राज्याच्या जीएसटी वसुलीत मोठी घट, लॉकडाऊनच्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेला फटका
- दीपिका सिंह नव्या डान्स व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर झाली ट्रोल…
- अंकिता लोखंडेचा चाहत्यांना ‘गुड बाय’ ; पोस्ट शेअर करत दिली माहिती
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

