Share

‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’

Published On: 

नवी दिल्ली- केवळ देशातच नव्हे तर जगभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. या विषाणूमुळे सर्वच देशांची डोकेदुखी वाढली असून या विषाणूचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वचजण प्रयत्न करत आहेत. या विषाणूचा उगम नेमका कुठे झाला याचा शोध घेतला जात असून कोरोना उत्पत्तीच्या कारणांचा देखील संशोधक शोध घेत आहेत.

दरम्यान,भारताला तर कोरोना विषाणू सोबतच अनेक नैसर्गिक आपत्तींचा देखील सामना करावा लागला आहे. यातच आता उत्तर प्रदेशमधील मुरादाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी करोना प्रादुर्भाव आणि देशांच्या दोन्ही किनारपट्ट्यांना धडकलेल्या चक्रीवादळांसंदर्भात एक अजब वक्तव्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे.

करोना आणि चक्रीवादळांसाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याचं हसन यांनी म्हटलं आहे. भाजपा सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्ती देशामध्ये आल्याचा अजब दावा हसन यांनी केला आहे.

हसन यांनी CAA आणि NRC कायद्यांच्या माध्यमातून मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केलाय. मागील सात वर्षांमध्ये मोदी सरकारने केवळ धार्मिक भेदभाव निर्माण करण्यासंदर्भातील कायदे बनवले. सरकारच्या या भेदभावामुळेच महासाथ आणि दोनदा वादळं येऊन गेली आहेत. जमीनीवरील लोकांनी न्याय दिला नाही तर आसमानवाला  न्याय करतो, असंही हसन यांनी म्हटलं आहे.

या सरकारला गरीब जनतेची चिंता नाहीय. सर्व वाटा केवळ श्रीमंतांचा आहे, असा टोलाही हसन यांनी लगावला. ज्याने श्रीमंतांना जन्म दिलाय त्यानेच गरीबांना जन्म दिलाय. तो सर्वांचा मालक आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता माझ्या अंदाजानुसार येणाऱ्या काळात आणखीन नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागेल, अशी भीतीही हसन यांनी बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!