मुंबई : सध्या अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असते. तिच्या एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देखील तिने काही पोस्ट केल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या होत्या. अधून-मधून अंकिता आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते तिचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. तिच्या या व्हडिओला प्रचंड लाईक्स देखील मिळतात.
नुकताच मानव-अर्चनाच्या या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंकिताने सुशांतच्या आठवणीत एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानिमित्त तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला. पण आता अंकितानं सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे.
https://www.instagram.com/p/CPpBG9qrHi8/?utm_source=ig_web_copy_link
अंकिता गेल्या वर्षभरापासून सुशांत सिंग राजपूत मृत्युमुळे चर्चेत होती. अंकिताने सुशांतला जाऊन वर्ष पूर्ण होत असतानाच सोशल मीडियावरून ब्रेक घेतला आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे. हे ‘गुडबाय नाही.. भेटू नंतर.’
महत्वाच्या बातम्या
- कौतुकास्पद : जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून डिसले गुरुजी यांची नियुक्ती
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ‘ते ट्विट मी केलं नव्हतं तर…’ सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर महापौरांची सारवासारव
- ‘उद्धवजी… नाकाने कांदे सोलू नका… मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या’
- ट्वीटर युजरचा ‘बाप’ काढणं महापौरांना पडलं महागात, सोशल मीडियावर होताहेत ट्रोल


