मुंबई : छोट्या पड्यावरील ‘दीया और बाती हम’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री दीपिका सिंह सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सध्या तिच्या सोशल मिडियावरील डान्सच्या व्हिडीओमुळेती चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मुंबईत तौक्ते वादळाच्या तडाख्यात उन्मळून पडलेल्या झाडांसमोर डान्स आणि फोटोशूट केल्याने दीपिका सिंह चांगलीच ट्रोल झाली होती. आता पुन्हा एकदा दीपिकाने नुकत्याच शेअर केलेल्या एका डान्स व्हिडीओमुळे ट्रोल होत आहे.
https://www.instagram.com/p/CPe6QpfBgh4/?utm_source=ig_web_copy_link
दीपिकाने इन्स्टाग्रामवर डान्स व्हिडीओ शेअर केला असून, या व्हिडीओत ती अमेरिकन रॅपर कार्डी बीच्या ‘अप’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दीपिकाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. काही चाहत्यांनी दीपिकाच्या डान्सला पसंती दिली असली तरी अनेक चाहत्यांनी तिच्या डान्सला नापसंची दर्शवली आहे.
याआधी वादळाच पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्यानंतर दीपिका ट्रोल झाली होती. यावर एका मुलाखतीत दीपिकाने ‘मी सकारत्मकता पसरवणं थांबवणार नाही. हे मी माझ्या आनंदासाठी करते. मला त्याचा पश्चाताप नाही मी फक्त सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला.चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते,’ असं सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा तीचा व्हिडीओ समोर आल्याने एकच चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच ‘ते’ आमंत्रण आम्ही स्वीकारतो; आशिष शेलारांच्या विधानाने उत्सुकता वाढली
- ऱ्हदयद्रावक! मायलेकीसह पुतणीचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू
- अजब ! 5G याचिकेवरील सुनावणीवेळी जुही चावला लागल्या गाणी गायला, कामकाजात आणले व्यत्यय
- एकच धून…६ जून ! शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य होण्यासाठी संभाजीराजेंनी जाहीर केली लिंक


