Share

राज्याच्या जीएसटी वसुलीत मोठी घट, लॉकडाऊनच्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेला फटका

Published On: 

मुंबई – एप्रिल-मे महिन्यादरम्यान राज्याच्या जीएसटीच्या वसुलीत 8130 कोटींची म्हणजेच 36.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. राज्यात एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर दिसून आला होता.त्यावेळी घोषित करण्यात आलेल्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेवर, विशेषतः जीएसटी वसुलीवर अधिक परिणाम केला आहे.

2019-20 मध्ये महाराष्ट्राने तब्बल 1.8 लाख कोटींची जीएसटी वसुली केली होती. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे पुढच्या आर्थिक वर्षात त्यात 20,609 कोटींची घसरण झाली आणि या वर्षात 1.6 लाख कोटींचा जीएसटी वसूल करण्यात राज्याला यश आले.

राज्याच्या गेल्या वर्षीच्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात एप्रिल -मे या दोन महिन्यांत 13 हजार 12 कोटी इतकी जीएसटी वसुली झाली होती. यंदा राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतरही या दोन महिन्यांत 35 हजार 412 कोटींची जीएसटी वसुली झाली आहे.तथापि, गेल्या वर्षीच्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळातील मे महिन्याच्या तुलनेत राज्याने तब्बल 59 टक्के अधिक जीएसटी वसुली केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!