Share

खंबाळा दरोडा प्रकरणातील दोन संशयितांना अटक

Published On: 

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील खंबाळा येथील दरोडा प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना रविवारी अटक केली आहे.त्यांना आज येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

२ जुलै रोजी खंबाळा फाटा येथे जिजाराम गोरसे यांच्या वस्तीवर मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जिजाराम यांचा मुलगा रविंद्र यांचा मृत्यू झाला होता.तर सुन मोनिका ही गंभीर जखमी झाली होती.या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती.तसेच पोलीस दलही हादरले होते.या घटनेचा तपास करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. विशेष पोलीस महानिरीक्षक के एम प्रसन्ना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीसांची वेगवेगळी पथके तयार केली होती.

नाशिक , अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात पथकाने तांत्रिक विश्लेषणा आधारे तपास केला.त्यानंतर शिताफीने दोन संशयितांना रविवारी सायंकाळी अटक केली.आरोपी हे अशा कारनाम्यासाठी प्रसिद्ध असून सराईत गुन्हेगार आहेत.ते रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत.आरोपींचा तपास लावण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक सम्राट राजपूत यांच्या पथकाने परीश्रम घेतले.चोरीच्या उद्देशानेच आरोपी हे गोरसे वस्तीवर आले होते.खंबाळा येथे त्यारात्री निर्मळ व त्रिभुवन वस्तीवर ही चोरीचा प्रयत्न झाला होता.अशी माहीती पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चोरीच्या उद्देशानेच ही घटना घडली.अन्य शक्यता मात्र त्यांनी फेटाळल्या.आरोपींची नांवे मात्र त्यांनी उघड केली नाही.आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.ते बाहेर राहाणे योग्य नाही.त्यामुळे त्यांना शिक्षा होईल.असा तपास करायचा असून तांत्रीक अडचणींमुळे तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार नांवे उघड करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!