Share

‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन

Published On: 

अकाेला : कोरोनामुळे राज्य विधिमंडळाचे दाेन दिवसांचे पावसाळी अधिवेशन आहे. मात्र, मराठा समाजाचे प्रश्न दाेन नव्हे, तर एका तासातही निकाली निघू शकतात. परंतु वादविवाद नकाे, त्याऐवजी आता पर्यायावर चर्चा हाेणे आवश्यक आहे. मराठा समाजाला न्याय कसा देता येईल, यावरच चर्चा हाेणे अपेक्षित आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे यांचा मराठा समाज जनसंपर्क दौरा रविवारी पार पडाला. समाजाला संबाेधित केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  ते म्हणाले,  आता न्यायालयाच्या निर्णयानंतर सामाजिक मागास राहिलाे नाही. मागास आहाेत, हे सिद्ध करायचे असल्यास मागासवर्गीय आयाेग गठीत करावा लागणार आहे. यापूर्वीच्या गायकवाड आयाेगाच्या अहवालातील त्रुटी दूर करून पुढील कार्यवाही करावी लागेल.

पदासाठी आंदोलन नकाे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते करतात. यावर संभाजीराजे यांनी प्रत्युत्तर दिले. काेण काय बाेलताे, यावर मी बाेलणार नाही. संभाजीराजे समाजाचा सेेवक आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज घराण्याचा वंशज आहे. मी प्रामाणिकपणे काम करत असून, समाजाचा माझ्यावर विश्वास आहे. फसवणूक करणे हे माझ्या रक्तात नाही. मी पदासाठी काम करत नाही. मी मराठा समाजाचा सेवक असून, बहुजन समाजाचे नेतृत्व करताे, असेही ते म्हणाले

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!