गाझियाबाद : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य केलं आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. ‘सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो. तसेच देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाहीत, तर एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेद करणं चुकीचं आहे.’ असं त्यांनी यावेळी सांगितलं.
भारतात इस्लाम धोक्यात आहे या भीतीच्या जाळ्यात फसू नका, असे आवाहन मोहन भागवत यांनी मुस्लिमांना केले. ते म्हणाले, आपण लोकशाहीत राहतो. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे प्रभुत्व राहू शकत नाही, फक्त भारतीयांचे प्रभुत्व असू शकते. मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू असू शकत नाही.’ भागवत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या ‘हिंदुस्तानी पहले, हिंदुस्तान पहले’ कार्यक्रमाला संबोधित करत होते.
भागवत म्हणाले, ‘पूजा करण्याच्या पद्धतीच्या आधारावर लोकांमध्ये फरक केला जाऊ शकत नाही.’ त्यांनी जमावाद्वारे मारहाण करून हत्येत (लिंचिंग) सहभागी लोकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘असे लोक हिंदुत्वविरोधी आहेत. तथापि, असाही एक काळ होता, जेव्हा काही लोकांविरुद्ध लिंचिंगचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रीयत्व आणि पूर्वजांचा गौरव हा एकतेचा आधार असायला हवा. हिंदू-मुस्लिम यांच्यातील वादांवर चर्चा हाच एकमेव तोडगा आहे, मतभेद नव्हे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव विधानसभेत मंजूर
- ‘पळून जायला मी काय मोदी आहे का?’, शिवसेना आ.प्रताप सरनाईकांनी आरोप फेटाळले
- ‘अनिल देशमुख देखील असेच मधात बोलत होते, आता ते आत जाताहेत’, मुनगंटीवारांचे सभागृहात वादग्रस्त वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

