🕒 1 min read
कोलकाता : काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील भाजपच्या काही जणांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता तृणमूल काँग्रेसनं काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र अभिजित मुखर्जी यांनी सोमवारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अभिजित यांनी पत्रकार परिषद घेतली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणात आणखी मोठी भूमिका बजावू शकतील असे त्यांनी सूचित केले. ते म्हणाले की, ममता यांनी अलीकडेच भाजपची जातीयवादी लाट ज्या पद्धतीने थोपविली ते पाहता इतरांच्या मदतीने संपूर्ण देशात तसे करणे त्यांना शक्य होईल.
The way Mamata Banerjee halted the recent communal wave by BJP, I believe that in the future, with the support of others, she would be able to do the same in the entire country: Abhijit Mukherjee, son of former President Pranab Mukherjee after joining TMC pic.twitter.com/Sx7eAefpM8
— ANI (@ANI) July 5, 2021
काँग्रेसनं प्राथमिक सदस्यत्वाशिवाय मला कोणत्याही समूह किंवा पदावर सहभागी करून घेतलं नव्हतं. त्यामुळे मी एक सैनिक म्हणून तृणमूलमध्ये सहभागी झालो आहे. मी पक्षाच्या दिशानिर्देशानुसार काम करेल. अखंडता आणि धर्मनिरपेक्षता कायम राखण्यासाठी मी काम करेल, असंही अभिजीत मुखर्जी यांनी यावेळी म्हटलंय.
नुकतेच अभिजीत बॅनर्जी यांनी खोट्या लसीकरण घोटाळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं समर्थन केलं होतं. ‘एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या कृत्यासाठी पश्चिम बंगाल आणि ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरणं योग्य नाही. हाच न्याय लावला तर मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय माल्ल्याशी निगडीत अनेक प्रकरणांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही जबाबदार धरलं जाऊ शकतं’ असं मुखर्जी यांनी म्हटले होते.
काही महिन्यांपूर्वी जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. अभिजित यांचे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. ते काँग्रेस संसदीय पक्षात सहकारी होते. दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे जितीन तसेच त्यांचे पिता जितेंद्र प्रसाद यांच्याशी आपुलकीचे संबंध होते. अभिजित यांनी पित्याच्या जांगीपूर मतदारसंघातून दोन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. मागील निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.
महत्वाच्या बातम्या
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
- ‘फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली शिवीगाळ, धक्काबुक्की झाली’, नवाब मलिकांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
