Share

मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’

Published On: 

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते, की सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो. एवढेच नाही, तर लिंचिंगसंदर्भात बोलताना ते म्हणाले होते, यात सहभागी असलेले लोक हिंदुत्वाविरोधात आहेत आणि लोकशाहीत हिंदूंचे अथवा मुस्लिमांचे प्रभूत्व राहू शकत नाही.

सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या विधानाला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भेकडपणा, हिंसा आणि हत्या करणं, हे गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचाच अविभाज्य भाग आहे. मुस्लिमांचे झुंडबळीही याच विचाराचे परिणाम आहेत,” अशी टीका ओवेसी यांनी सरसंघचालकांवर केली.

असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ”आरएसएस प्रमुख भागवत म्हणतात, की लिंचिंग करणारे हिंदुत्व विरोधी आहेत. यांना गाय आणि म्हैस यांच्याचील फरक माहीत नसेल. मात्र, मारण्यासाठी जुनैद, अखलाक, पहलू, रकबर, अलीमुद्दीन नावेच पुष्कळ होती. हा द्वेश हिंदुत्वाची देण आहे. या गुन्हेगारांना हिंदुत्ववादी सरकारचे रक्षण आहे.”

काय म्हणाले होते मोहन भागवत?
सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो. तसेच देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाहीत, तर एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेद करणं चुकीचं आहे. जमावाद्वारे मारहाण करून हत्येत सहभागी होणारे लोक हिंदुत्वविरोधी आहेत. तथापि, असाही एक काळ होता, जेव्हा काही लोकांविरुद्ध लिंचिंगचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रीयत्व आणि पूर्वजांचा गौरव हा एकतेचा आधार असायला हवा. हिंदू-मुस्लिम यांच्यातील वादांवर चर्चा हाच एकमेव तोडगा आहे, मतभेद नव्हे, असे भागवत यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!