🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याने नुकताच त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान या पार्टी संदर्भात अनेक बातम्या समोर येत होते. आता एक या पार्टी संदर्भात एक विचित्र बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार करण जोहरच्या पार्टीमध्ये काही अनोळखी लोक विनाकारण घुसले होते.
करण जोहरचा ५० वा वाढदिवस हा बॉलिवूड मधील मोठ्या कार्यक्रमांपैकी एक महत्त्वाचा कार्यक्रम होता. करणने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. करणच्या या पार्टीत बॉलिवूडमधील सर्व दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. जेव्हा प्रसिद्ध कलाकार मोठमोठया पार्टीला जातात तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले जाते. पण प्रत्येक कलाकार कोणत्याही सुरक्षेशिवाय रेड कार्पेटवर चालावा याची दक्षता कारण जोहरने घेतली होती. कलाकारांना ही त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय त्यांना पार्टीला येण्याची माहिती दिली गेली होती. या पार्टीमध्ये सलमान खान सुद्धा एकटाच आला होता जो कायम अंगरक्षकांनी घेरलेला असतो.
https://www.instagram.com/p/CeGacqfo2GL/
सूत्रांच्या माहितीनुसार पार्टीमध्ये सुरक्षा परवानगी नसल्यामुळे दोन अनोळखी व्यक्तींनी परवानगीशिवाय पहाटे पार्टीमध्ये प्रवेश केला. त्या दोघांना स्वतः करणने पाहिले होते. करणने त्वरित त्या दोघांना पार्टीमधून बाहेर जाण्यास सांगितले. या पार्टीमध्ये करणने प्रत्येक छोट्या गोष्टींची काळजी घेतली. यामुळे लोक त्याचे कौतुक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

