Share

भुसावळमध्ये रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांना अडीच लाखांची लाच घेताना अटक, सीबीआयची कारवाई

Published On: 

भुसावळ : रेल्वे बांधकामाचं अडीच कोटीचं टेंडर मिळाल्यानंतरही वर्क ऑर्डर काढण्यासाठी लाच घेणाऱ्या दोन रेल्वे अधिकाऱ्यांना सीबीआयनं रंगेहाथ अटककेली आहे. सोमवारी डीआरएम कार्यालयात सीबीआयच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सीबीआयच्या पथकाच्या १८ अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री उशीरा संबंधित अधिकाऱ्यांच्या घराचीही झाडाझडती घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून रेल्वेचे कामे केली जातात. या कंपनीने सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कन्स्ट्रक्शन कामासाठी निविदा भरली होती. या कंपनीचे निविदा दर कमी होते. यामुळे या कंपनीला वर्क ऑर्डर देणे अपेक्षित होते. पण वर्क ऑर्डर देण्यासाठी मंडळ अभियंता एम. एल. गुप्ता यांनी चार लाख रुपये लाचेची मागणी केली होती. यातील २ लाख वर्क ऑर्डर देण्यापूर्वी व २ लाख बिलिंग झाल्यानंतर देण्याचे ठरले होते.

यासोबतच बांधकाम अभियांत्रिकी विभागाचे कार्यालयीन अधीक्षक संजीव रडे यांनी २.२५ टक्के रक्कम वेगळी मागितली होती. या प्रकरणी कंपनीच्या संचालकांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून नागपूर, पुणे व मुंबई येथील संयुक्त पथकाने सापळा रचून सोमवारी डीआरएम कार्यालयात मंडळ अभियंता गुप्ता यांना दोन लाख रुपये रोकड स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर संजीव रडे यांना ४० हजार रुपयांची रोकड घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. रेल्वे विभागातील मोठे मासे गळाला लागल्यानं रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!