🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असा गंभीर आरोप केला होता. यानंतर राष्ट्रवादीकडूनही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला. यानंतर आता मनसेकडून राष्ट्रवादीवर पलटवार करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीवर ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची घणाघाती टीका केली.’ असे म्हणत टीकास्त्र सोडले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर महाराष्ट्रात जाती पातीच्या राजकारणाची सुरुवात झाल्याचा आरोप केला. याचेच समर्थन करत देशपांडे यांनी असे वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले की,“राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचे आणि आखुडते राजकारण करायचे हे महाराष्ट्र गेले २० वर्षे बघत आहे. राष्ट्रवादीने जे केले ते राज ठाकरे बोलले आहेत, यात चुकीचे काहीच नाही.’ पुढे देशपांडे प्रवीण गायकवाड यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की,’ जे कोणी आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत आहेत त्यांना योग्य उत्तर दिले जाईल. तसेच या पुढील भूमिका राज ठाकरे ठरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 17, 2021
दरम्यान,लोकल संदर्भात बोलतांना देशपांडे म्हणाले की, ‘लोकलबाबत निर्णय झाला, पण अनेकांना पास मिळत नाहीत. दुसरा डोस अनेकांना मिळाला नाही. तसेच फक्त पास नको, तिकीट पण द्या.’
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची होणार आज घोषणा
- अफगाणिस्तानच्या प्रसिध्द निर्मातीने मागितले मदतीचे आवाहन
- लॉर्ड्सवर कोहलीचा मोठा विक्रम, वेस्ट इंडिजच्या महान कर्णधाराला टाकले मागे
- केएल राहुलने संपवला 44 वर्षांचा दुष्काळ, अशी कामगिरी करणारे गावस्कर होते पहिले भारतीय सलामीवीर
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
