🕒 1 min read
आंध्र प्रदेश: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारतात शांतत नांदावी यासाठी तिरुपतीला साकडे घातले. यावेळी त्यांनी तिरुपती मंदिराला भेट देत दर्शन घेतेले. दरम्यान तिरुपती मंदिर संस्थानकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
‘शांत आणि समृद्ध भारत आणि लोकांच्या कल्याणासाठी तिरुमाला मंदिरात भगवान वेंकटेश्वर स्वामींना ओम बिर्ला यांनी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी ‘परमेश्वराचे दर्शनच आंतरिक शांतीची भावना देते’.असे त्यांनी म्हटले. दरम्यान यावेळी ते मंदिराचे वास्तुशिल्प सौंदर्य, त्याची भव्यता यात ते मोहून गेले.
Offered prayers to Lord Venkateswara Swamy at Tirumala temple for a peaceful & prosperous Bharat and well being of the people. The very sight of the divine Lord gives a sense of inner peace. The architectural beauty of the temple, in all its magnificence, is enthralling. pic.twitter.com/Up0ZVnYcq6
— Om Birla (@ombirlakota) August 17, 2021
दरम्यान संसदेतील गोंधळ, पेगासस प्रकरणावरून विरोधकांनी घातलेला प्रचंड गोंधळ, मार्शल प्रकरण यामुळे पहिल्यांदा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना रडू कोसळले. संसदेचा अपमान, प्रतिष्ठा भंग करण्यात आला. यासर्व प्रकरणानंतर आपल्याला झोप आली नाही असे वक्तव्य ओम बिर्ला यांनी केले होते. यासर्व प्रकरणानंतर संसदेचा मर्यादाभंग झाल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला. दरम्यान पहिल्यांदा संसदेत एवढा गोंधळ झाल्याची घटना घडली. दरम्यान या प्रकरणानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तिरुपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भारतात शांतता नांदावी यासाठी तिरुपतीला साकडे घातले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची होणार आज घोषणा
- अफगाणिस्तानच्या प्रसिध्द निर्मातीने मागितले मदतीचे आवाहन
- लॉर्ड्सवर कोहलीचा मोठा विक्रम, वेस्ट इंडिजच्या महान कर्णधाराला टाकले मागे
- केएल राहुलने संपवला 44 वर्षांचा दुष्काळ, अशी कामगिरी करणारे गावस्कर होते पहिले भारतीय सलामीवीर
- ‘जिम-मॉल सुरु झाले, सिनेमांना इतर पर्याय मिळाले…मात्र नाट्यभूमीचं काय ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
