Share

अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर भारताची भूमिका स्पष्ट, घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी सरकार उलथवून टाकल्यानंतर इथं अभूतपूर्व गोंधळाची परिस्थिति निर्माण झाली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची काल तातडीची बैठक झाली. अफगाणिस्तानमध्ये तातडीनं हिंसाचार थांबवून नव्या, सर्वसमावेशक सरकारची स्थापना करावी, असं आवाहन बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आलं आहे.

युएनएससीच्या बैठकीत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी भारताच्या वतीने सांगितले की, ‘दहशतवादी गटांकडून अफगाणिस्तानचा वापर इतर कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी केला जात नाही. तोवर शेजारी देश सुरक्षित असतील. आम्ही काबुलच्या हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चित्र पाहिले आहे. त्यातून लोकांमध्ये दहशत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. महिला, लहान मुले संकटात आहेत. विमानतळासह शहरातून गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानातील सध्याची स्थिती चिंताजनक आहे.’

तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाचे कर्मचारी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात निमलष्करी दलांसह २०० हून अधिक भारतीय सध्या काबूलमध्ये अडकले आहेत. एक भारतीय विमान सध्या काबूल विमानतळावर उभे आहे. मात्र, तालिबान्यांनी शहरात कर्फ्यू लावला असल्याने भारतीय नागरिकांना विमानतळावर कसे आणावे ही मुख्य चिंता आहे.

दरम्यान, भारत सरकार काबुलमधल्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि तिथून भारतात परतण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची अस्वस्थता आपल्याला कळत आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे. तिथे असलेल्या भारतीयांबद्दल अचूक माहिती मिळणं महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

याबाबतची सर्व माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या अफगाणिस्तानच्या विशेष संपर्क क्रमांकावर आणि ईमेलवर द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. भारत सरकार काबुलमधल्या शीख आणि हिंदू नागरिकांच्या सातत्याने संपर्कात असून त्यांच्या हिताला सरकारचं पहिलं प्राधान्य असेल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. जयशंकर यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अॅंटनी ब्लिंकन यांच्याशी अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. जगभरातल्या अनेक बड्या नेत्यांनी अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!